बिजवडी (जि. सातारा) माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका. त्यात राजवडी ,बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. त्याच राजवडीत निसर्गाच्या कृपेमुळे सर्व बंधारे ,तलाव ,ओढेनाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तलावाला धबधब्याचे स्वरूप आले. हा धबधबा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील तरूणवर्ग ,लहानमुले गर्दी करत आहेत.